लखनौच्या झोपडपट्टीत राहिली दिव्या खोसला

अभिनेत्री आणि फिल्ममेकर दिव्या खोसला हिने आगामी ‘एक चतुर नार’ या चित्रपटासाठी लखनौच्या झोपडपट्टीत मुक्काम केला. झोपडपट्टी, वस्तीतील जीवन जवळून बघता यावं आणि अभिनयासाठी हा जिवंत अनुभव उपयोगी पडावा, यासाठी तिने हे धाडसी पाऊल उचलले. त्यामुळे चाहत्यांना मोठे सरप्राईज मिळाले. दिव्याने चित्रपटाशी संबंधित एक झलक नुकतीच शेअर केली. झोपडपट्टीतील लोक प्रतिकूल परिस्थितीत कसं जगतात, संघर्ष करून कुटुंबाला कसं सांभाळतात, हे मला जाणून घेता आलं, असे दिव्याने सांगितले.