जयाप्रदा यांना सहा महिन्यांची शिक्षा

प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरमधील समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जयाप्रदा यांना चेन्नई न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. रायपेटा येथील त्यांच्या थिएटरमधील कर्मचाऱयांनी केलेल्या याचिकेप्रकरणी जयाप्रदा यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच जयाप्रदा यांना 5,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. चित्रपटगृहाचे काम पाहणाऱया इतर दोघांनाही सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.