चित्रपटसृष्टी हादरली, बिग बॉस फेम अभिनेत्री जयश्रीची आत्महत्या

चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या आत्महत्यांचे सत्र नव्या वर्षातही कायम आहे. आता बिग बॉस फेम (कन्नड) अभिनेत्री जयश्री रमैया हिने आत्महत्या केली असून यामुळे चित्रपटसृष्टी हादरली आहे. जयश्री हिने फाशी लावून आत्महत्या केली असून बंगळुरूमधील एका वृद्धाश्रमात तिचा मृतदेह सोमवारी दुपारी आढळून आला. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, अभिनेत्री जयश्री बिग बॉस सिझन 3 (कन्नड) मध्ये सहभागी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ती डिप्रेशनमध्ये होती आणि बंगळुरूमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. 2020 मध्ये तिने सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करत आपली मानसिक स्थिती खराब असल्याचे संकेत दिले होते. मात्र आता उपचार सुरू असतानाच तिने फाशी घेऊन आत्महत्या केल्याने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

actress-jayashree

डिप्रेशनची दिली होती माहिती

गेल्या वर्षी अभिनेत्री जयश्री हिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून आपली मानसिक स्थिती खराब असल्याची माहिती दिली होती. डिप्रेशन आणि या जगाला ‘क्विट’ करत असल्याचे तिने म्हटले होते. यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर तिने चाहत्यांचे मन राखण्यासाठी आपण ठिक असल्याचे म्हटले होते. परंतु आता तिची डिप्रेशनशी सुरू असलेली झुंज संपली असून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या