सुंदर अभिनेत्रीला उगवल्या मिश्या! म्हणतेय ‘मी स्त्रीच्या वेशातली पुरुष’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मथळा वाचून निश्चितच चक्रावून गेला असाल. अभिनेत्रीला मिश्या उगवणं कसं शक्य आहे. पण एका अभिनेत्रीने तसा फोटो शेअर केलाय खरा. ही अभिनेत्री आहे अदा शर्मा.

अदा शर्मा हिने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला होता. त्यात तिला मिश्या असल्याचं दिसतंय. त्या फोटोखाली तिने मी स्वप्नांमधला पुरुष असल्याचंही म्हटलं आहे. पण, तिची ही कॅप्शन खळबळजनक वाटली तरी त्यात एक गंमत आहे. तिने या कॅप्शनमधून तिच्या आगामी चित्रपटाबाबत सूतोवाच केलं आहे.

मॅन टू मॅन असं तिच्या या चित्रपटाचं नाव असून त्यात ती ट्रान्सजेंडर व्यक्तीची भूमिका करताना दिसणार आहे. ही एक प्रेमकथा असणार असून अद्याप तिच्या नायकाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे अदाच्या या चित्रपटात नायक कोण असेल त्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.