मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आदासा कोळसा खाणींचे उद्घाटन

2089

येत्या चार वर्षांत महाराष्ट्रात चौदा खाणी सुरू होत आहेत आणि त्यातील तीन या वर्षी सुरू होतील. या खाणींमुळे 11 हजार 500 कोटींची गुंतवणूक होईल आणि सुमारे 13 हजार लोकांना रोजगार मिळेल अशी माहिती शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या कोळसा खाणींच्या उदघाटनाच्या निमित्ताने देण्यात आली.

वेस्टर्न कोलफिल्डच्या नागपूरजवळील आदासा आणि मध्य प्रदेशातील दोन कोळसा खाणींचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. उद्धव ठाकरे यांनी या खाणींचे ऑनलाइन उदघाटन केले. आदासा खाणीत 334 कोटी रुपये गुंतवणूक केली जात असून 1.5 दशलक्ष टन कोळसा उत्पादन होणार आहे. 550 जणांना रोजगार मिळणार आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण ग्रामीण भागाला अव्याहतपणे परवडणाऱ्या दरात व अखंडित वीज पुरवठा करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही सूचना केल्या. भंडारा जिल्हा पालकमंत्री सुनील केदार, इतर लोकप्रतिनिधी तसेच वेस्टर्न कोलफिल्डचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या