बंगालची वाघीण असलेल्या ममता बॅनर्जी अदानींविरोधात का बोलत नाही? काँग्रेसचा सवाल

पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर काँग्रेसने टीका केली आहे. ममता या गौतम अदानींबाबत काहीच बोलत नसल्याने त्यांच्यावर ही टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलंय की, ‘ममता आणि अदानी यांचे बहुधा चांगले संबंध असावेत ज्यामुळे ममता अदानींबाबत काहीच बोलत नाही. बंगालमध्ये ताजपूर बंद प्रकल्प उभा राहात असून याप्रकल्पाची सुरुवात झाल्यापासून ममता बॅनर्जी यांचे अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेले संबंध चांगले झाले असावेत. ममता आता ना पंतप्रधानांविरोधात बोलतात ना अदानींविरोधात. आम्ही ममता यांना बंगालची वाघीण म्हणतो मात्र सध्या त्या थंड झाल्या आहेत.’