
सामना ऑनलाईन । मुंबई
अभिनेत्री कंगना रनौत ही काळीजादू करते असे आरोप करणारा तिचा एक्स बॉक्सफ्रेंड व बॉलिवूड अभिनेता अध्ययन सुमनचे एका मॉडेलसोबत अफेयर असल्याचे समोर आले आहे. मायरा मिश्रा असे त्या मॉडेलचे नाव असून काही दिवसांपूर्वी ती एमटीव्हीवरील ‘स्प्लिट्सव्हिला’ या कार्यक्रमात झळकली होती. मायरा व अध्ययनच्या इंस्टाग्रामवर दोघांचे एकत्र फोटो आहेत.
अध्ययन सुमनचा 13 जानेवारीला वाढदिवस होता. त्या दिवशी मायराने इंस्टाग्रामवर अध्ययन सोबतचा फोटो टाकला होता. त्यानंतर त्यांच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता नुकताच तिने पुन्हा एकदा एक अध्ययन सोबतचा रोमॅण्टिक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवरून या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजत असल्याची चर्चा रंगली आहे.
कंगना रनौत व अध्ययन सुमन हे राझ-2 च्या सेटवर भेटले होते. त्यानंतर ते एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्येही होते. मात्र कंगना व अध्ययनचे ब्रेकअप झाल्यानंतर अध्ययनने तिच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. कंगना ही काळू जादू करते असा आरोपही त्याने केला होता.



























































