
शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रा आणि महारेशीम महोत्सव 2019 च्या उद्घाटनप्रसंगी जालन्यात आले होते. या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या स्वागतासाठी व्यासपीठाच्या बाजूला तांडव ढोल पथकाचे कार्यकर्ते ढोल वाजवत असताना आदित्य ठाकरे यांचे लक्ष त्या पथकातील बाल ढोल वादकाकड़े गेले. आदित्य ठाकरे यांनी ढोल पथकातील बाल कार्यकर्त्याची चौकशी करत त्याच्यासोबत ढोल वाजवला. यावेळी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.



























































