नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, आदित्य ठाकरे यांचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aditya-thackeray-pachora-speech

सामना ऑनलाईन । पाचोरा

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज जळगावमधील पाचोरा येथून दणदणीत सुरुवात झाली. पाचोऱ्यातील विराट सभेला उद्देशून बोलताना नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

‘हीच ती वेळ, हीच ती संधी आहे नवा महाराष्ट्र घडवायची’, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. जिथे जिथे त्रास आहे, तिथे तिथे शिवसेनेचा मदतीचा हात आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.