आदित्य ठाकरे यांची लोकप्रियता वाढली! दोन दिवसांत 23 कॉलेजमध्ये युवासेना कॉलेज कक्षाची स्थापना

3139

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्व आणि दूरदृष्टीवर विश्वास ठेवत दोन दिवसांत 23 महाविद्यालयांमध्ये युवासेना कॉलेज कक्षाची स्थापना झाली आहे. ही महाविद्यालये मुंबई, ठाणे आणि रायगड जिह्यांमधील असून सर्वच महाविद्यालयांत युवासेनेचा झंझावात निर्माण झाला आहे.

युवासेनेची स्थापना झाल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सातत्याने शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱया समस्या आणि अडचणी सोडविण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे युवा वर्गात आदित्य ठाकरे यांना सातत्याने वाढता पाठिंबा मिळत आहे. पदवीधर युवकांनीदेखील आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुंबई विद्यापीठात युवासेनेच्या सर्वच सदस्यांना निवडून देत इतिहास घडवला होता. युवासेनेचे विद्यार्थीहिताचे कार्य पाहून मुलुंड ते पेण पट्टय़ातील 23 महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजमध्ये युवासेना कॉलेज कक्षाची स्थापना केली. नुकतेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी दोनदिवसीय दौरा करत या सर्व कॉलेज कक्ष फलकांचे अनावरण केले.

युवासेनेचे कार्य तसेच विद्यार्थी आणि युवकांच्या विश्वासावर येत्या काही दिवसांत किमान 100 महाविद्यालयांत युवासेना कॉलेज कक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

ही आहेत महाविद्यालये

मुलुंड कॉमर्स कॉलेज (मुलुंड), व्ही.पी.एम.आर.झेड शाह कॉलेज (मुलुंड), वझे-केळकर कॉलेज (मुलुंड), न्यू हॉरिझन स्कॉलर्स कॉलेज (ऐरोली), एस.डी.व्ही. कॉलेज (ऐरोली), जे.व्ही.एम.मेहता कॉलेज (ऐरोली), दत्ता मेघे इंजिनीयरिंग कॉलेज (ऐरोली), लोकमान्य टिळक इंजिनीयरिंग कॉलेज (घणसोली), पिल्लाई कॉलेज (पनवेल), एम.जी.एम.कॉलेज (पनवेल), कोकण ज्ञानपीठ कॉलेज (कर्जत), कोकण ज्ञानपीठ इंजिनीयरिंग कॉलेज (कर्जत), यादवराव तासगावकर कॉलेज (कर्जत), मातोश्री कॉलेज (नेरळ), दिलकॅप कॉलेज (नेरळ), युनिव्हर्सल बिझनेस स्कूल (कर्जत), अभिनव ज्ञानमंदिर (नेरळ), विश्वनिकेतन कॉलेज (खालापूर), भाऊसाहेब नेने कॉलेज (पेण), डॉ. पतंगराव कदम कॉलेज (पेण), शासकीय तंत्रनिकेतन (पेण), जे. एन. पालीवाला कॉलेज (पाली), आनंदीबाई प्रधान कॉलेज (नागोठाणे).

आपली प्रतिक्रिया द्या