
सामना प्रतिनिधी । मुंबई
प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी बुधवार, 29 मेपासून सुरू होणार आहे. मुंबई विद्यापीठ तसेच संलग्नित कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना ही नोंदणी अनिवार्य आहे.
mum.digitaluniversity.ac या वेबसाइटवरील Mumbai University Pre Admission online Registration 2019-20 या लिंकवर जाऊन नोंदणी करता येईल. अर्ज भरताना अडचणी आल्यास 66834821 या हेल्पलाइनवर संपर्क करता येईल.
हे लक्षात ठेवा
- माहिती पुस्तिकेनुसार विषय व विषयसमुहाप्रमाणेच विषय निवडणे बंधनकारक.
- स्वतःचा स्कॅन केलेला फोटो आणि स्वाक्षरीची सॉफ्ट कॉपी आवश्यक आहे.
- विषय अंतिम करण्याचे अधिकार प्राचार्यांना.
- ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांकही हवा, दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका सोबत ठेवाव्यात.
- विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन प्रवेश नोंदणी अर्जाची प्रत असल्याशिवाय महाविद्यालयात तो प्रवेश घेऊ शकणार नाही.
- अर्ज विक्री : 29 मे ते 7 जून
- ऑनलाइन नोंदणी : 29 मे ते 10 जून
- अर्जाची प्रिंट महाविद्यालयात सादर करण्याची तारीख : 7 जून ते 13 जून
- पहिली गुणवत्ता यादी : 13 जून, सायं. 5 वा.
- कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे : 14, 15, 17 जून, सायंकाळी30 पर्यंत
- दुसरी गुणवत्ता यादी : 17 जून, सायं. 5 वा.
- कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे : 18 ते 20 जून, सायंकाळी 5 पर्यंत
- शेवटची यादी : 20 जून, सायं. 5 वा.
- कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे : 21 ते 24 जून सायंकाळी 5 पर्यंत
























































