व्हीईएसएएससीच्या नव्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 व्हीईएस कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) यांनी बीएससी डेटा सायन्स व डेटा अॅनालिटिक्स आणि एमए पब्लिक पॉलिसी अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेशन या दोन स्वायत्त अभ्यासक्रमांसाठी प्रवेश जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांना सैद्धांतिक आणि प्रत्यक्ष ज्ञानातून भविष्यकालीन तंत्रज्ञानामधील नवीन काwशल्ये शिकता यावीत हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. ग्लोबल ज्ञान यांनी दिलेल्या 21-सी काwशल्य कार्यक्रमांतर्गत हा पदवी अभ्यासक्रम आहे. विद्यार्थी www.ves.ac.in/vesasc. या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. प्रवेशाची अंतिम तारीख 15 जुलै आहे.