गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा! केडीएमसी शाळांमध्ये आजपासून प्रवेशोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा’ अशी आपुलकीची साद घालत केडीएमसीने महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रवेशोत्सवाचे आयोजन केले आहे. पालिका शाळांमध्ये उच्च दर्जाचे मोफत शिक्षण तसेच सोयीसुविधा दिल्या जात असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना पालिका शाळांमध्ये दाखल करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांनी त्यांच्या शाळा परिसरात मुलांचे सर्वेक्षण केले असून या विद्याथ्र्यांना गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या विद्यथ्र्यांचे शाळेमार्फत फुले देऊन स्वागत केले जाणार आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये सजावट केली आहे. सकाळी 9 ते 11 या वेळेत महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये एकाच वेळी प्रवेशोत्सव होणार असल्याची माहिता शिक्षण उपआयुक्त अनंत कदम यांनी दिली.

आयुक्त करणार स्वागत
आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी हे स्वत: विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी महात्मा फुले प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक 68  बारावे, कल्याण (प.) येथे उपस्थित राहून विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत करणार असल्याची माहिती शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी जे.जे. तडवी यांनी दिली.