आव्हाने पेलून दबदबा निर्माण करा अ‍ॅड. उज्वल निकम यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी  

जीवन जगत असताना समोर आव्हाने भरपूर असून संघर्षातून प्रतिवूâल परिस्थितीवर मात करत ती आव्हाने पेलून आपला दबदबा निर्माण करावा, असा कानमंत्र विशेष सरकारी अभियोक्ता पद्मश्री अ‍ॅड. उज्वल निकम यांनी विद्यार्थ्यांना दिला.

वसंतराव नाईक मराङ्गवाडा कृषी विद्यापीङ्गाच्या सभागृहात ‘युवकांची सामाजिक जबाबदारी व भविष्यातील आव्हाने’ या विषयावर आयोजित व्याख्यानात अ‍ॅड. निकम बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. अशोक ढवण हे होते. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे तसेच शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, विस्तार संचालक डॉ. प्रदीप इंगोले, कुलसचिव रणजित पाटील, आयोजक डॉ. धनराज गोखले हे होते. दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

प्रास्ताविक कुलगुरु डॉ. ढवण यांनी केले. या कार्यक्रमात अ‍ॅड. उज्वल निकम यांच्याहस्ते राज्यात प्रथम आलेला रुपेश बोबडे, रंगोली पडघन, प्रतीक्षा पवार, शैलेंद्र कटके, देवयानी शिंदे, मंजुषा कातकडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अ‍ॅड. उज्वल निकम यांनी आपण अपघाताने वकील झालो असल्याचे सांगितले. युवकांची सामाजिक जबाबदारी व भविष्यातील आव्हाने हा विशय लांबलचक असला तरी विद्यार्थ्यांपूढे खरोखरच मोठी आव्हाने आहेत. प्रथम आत्मविश्वासाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला शिकले पाहिजे. आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठीच आपण शिक्षण घेत असल्याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवावे. चांगला आणि वाईट यातील फरक कळाला पाहिजे. आत्मचिंतन महत्त्वाचे असून मनाला बोलते केले पाहिजे. वृत्ती आणि प्रवृत्ती ओळखता आली पाहिजे. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कृषी विद्यापीठाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

परभणीच्या रस्त्यांसाठी गडकरींची भेट

परभणी जिल्ह्यातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. परभणी जिल्हृयात रस्त्याच्या निर्मितीसाही आपण केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन याबाबत मागणी करणार असल्याचे सांगत परभणीत कृषी विद्यापीठ असून रस्त्याची मात्र चाळणी झाली आहे. ही बाब कृषी संशोधनचे पियूष गोयल यांच्याकडे रस्त्यांबद्दल म्हणणे मांडणार असल्याचे अ‍ॅड. निकम यांनी बोलून दाखविले.