आफ्रिकन मुलांचा ‘काला चष्मा’ डान्स सुपरहिट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वत्र काला चष्मा गाण्याची भलतीच क्रेझ दिसून येत आहे. या गाण्यावरील रिल्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच मजेदार डान्स करत आहेत. या गाण्याची हवा फक्त आपल्या देशात नव्हे तर आफ्रिकेतही पोचली आहे. नुकताच काही आफ्रिकन मुलांचा एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते ‘काला चष्मा’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. त्याचा व्हिडीओ सिंगर नेहा कक्करनेदेखील शेअर केला आहे. या मुलांना हिंदी आणि पंजाबी बोल कळत नसले तरी त्यांनी सुंदर सुंदर आणि उत्तम अभिनय केला आहे. त्यांच्या प्रत्येक डान्स स्टेपने मन जिंकून घेतले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.