
सामना ऑनलाईन । मुंबई
अलीकडेच काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या आणि उत्तर मुंबईची उमेदवारी पटकावलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने तिला धर्मावरून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. माझा नवरा जरी मुस्लिम धर्मीय असला तरीही मी माझा धर्म बदललेला नाही. मी हिंदूच आहे, असे तिने म्हटले आहे. उर्मिलाने प्रचाराला सुरुवात केल्यानंतर तिने लग्नानंतर धर्म बदलल्याच्या अफवा पसरल्या होत्या, परंतु आपण हिंदूच असल्याचे सांगून तिने सर्व प्रकारच्या अफवांना पूर्णविराम दिला.



























































