
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये अराजकता निर्माण झाली आहे. पाकिस्तानी विमानतळांवर आणीबाणी जाहीर करण्यात आली आणि अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. हिंदुस्थानने या कारवाईचे वर्णन दहशतवादाविरुद्धचे पाऊल म्हणून केले आहे.
हिंदुस्थानने पाकिस्तानातील ही 9 ठिकाणे उद्ध्वस्त केल्यानंतर, पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील मशिदींमधून सतत घोषणा देण्यात येत आहेत. सध्याच्या घडीला पाकिस्तानात दहशतीचे वातावरण आहे. मशिदींद्वारे लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचे आवाहन केले जात आहे. या काळात घरात कोणीही उपस्थित राहू नये. लोक आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत, मशिदींमधून घोषणा दिल्या जात आहेत की लोकांनी आपली घरे सोडावीत, सरकारने त्यांना हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यास सांगितले आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश संतापाच्या आगीत जळत होता. हिंदुस्थान बदला घेण्याची तयारी करत होता, हल्ल्यानंतर काही दिवसांनी सैन्याला मोकळीक देण्यात आली होती. सैन्याने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर आता आपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हवाई हल्ला केला आहे.
सध्याच्या घडीला पाकिस्तानात दहशतीचे वातावरण आहे. मशिदींद्वारे लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचे आवाहन केले जात आहे. या काळात घरात कोणीही उपस्थित राहू नये. लोक आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत, मशिदींमधून घोषणा दिल्या जात आहेत की लोकांनी आपली घरे सोडावीत, सरकारने त्यांना हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यास सांगितले आहे.