डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल देण्याच्या मागणीला विरोध, ही तर सरळ सरळ चापलुसी…

पाकिस्ताननंतर आता इस्रायलनेही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचे नोबेल देण्याची मागणी केली आहे. पाक आणि इस्रायलच्या या मागणीला विरोध होत आहे. ही केवळ चापलुसी आहे, असा हल्ला स्वीडनचे माजी पंतप्रधान कार्ल बिल्ड्ट यांनी चढवला.भारत-पाकमधील युद्ध थांबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल ट्रम्प यांना नोबेल देण्यात यावे, अशी मागणी पाकिस्ताने केली होती. त्यानंतर आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनीही ट्रम्प यांचे नाव पुढे केले आहे.

नोबेल कोणाला दिला जातो?

स्वीडिश उद्योगपती अल्फ्रेड नोबेल यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो. त्यांनी आपल्या मृत्युपत्रात पुरस्काराबाबत लिहून ठेवले आहे. त्यानुसार, दोन देशांमध्ये सौहार्द वाढवण्यासाठी, शांततेचा प्रसार करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणाऱया व्यक्तीला हा पुरस्कार मिळायला हवा. मात्र ट्रम्प यांचे नाव काही लोक स्वार्थासाठी पुढे करत आहेत, अर्से बिल्ड्ट यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.