Photo – ममता बॅनर्जींचा हटके अंदाज, पाणीपुरीनंतर दार्जिलिंगच्या रस्त्यांवर बनवले मोमोज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना राजकारणाशिवायही अनेक गोष्टींमध्ये रस आहे.

ममता बॅनर्जी यांचा आणखी एक फोटो व्हायरल झाला असून यात त्या दार्जिलिंगच्या (Darjeeling) रस्त्यावर असणाऱ्या एका स्टॉलमध्ये मोमोज (Momos) बनवताना दिसताहेत.

मागे एकदा ममता बॅनर्जी यांचा स्कूटी चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, तर दोन दिवसांपूर्वीच त्यांचा पाणीपुरी बनवतानाचा फोटोही व्हायरल झाला होता.

आता मोमोज बनवतानाचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात त्या महिला बचत गटातील महिलांसोबत चर्चा करताना दिसताहेत. तसेच भाजीपाल्याचे दरही जाणून घेतले.

आज दार्जिलिंगमध्ये सकाळी फिरायला गेले असताना मोमोज बनवले. तुमच्यासोबत हे खास क्षण शेअर करण्यास उत्सुक आहे, असे कॅप्शन ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.