दोन वर्षांच्या संघर्षानंतर जाग; केंद्र आणि कुकींमध्ये सात करार, शांतता नांदण्यासाठी प्रयत्न; महामार्ग-2 केला खुला

कुकी आणि मैतेईंमध्ये गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. हिंसाचारात तब्बल 226 जणांचा मृत्यू झाला, तर 1100 हून अधिक लोक जखमी झाले. या संघर्षाच्या तब्बल दोन वर्षांनंतर केंद्र सरकारला जाग आली असून कुकींसोबत सात करार करण्यात आले आहेत. राज्यात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच कुकी जो काऊन्सिल राष्ट्रीय महामार्ग 2 जीवनावश्यक वस्तूंसाठी पूर्णपणे खुला करून देण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग 2 वर शांतता राखण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. हा महामार्ग मणिपूरला नागालँड आणि ईशान्येकडील राज्यांशी जोडणारी लाईफलाईन आहे. आज दिल्लीत केंद्र सरकार, मणिपूर सरकार आणि कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन तसेच युनायडेट पीपल्स फ्रंट यांच्यात बैठक झाली.

या सात मुद्द्यांवर सहमती

राज्यभरात एकता टिकून राहावी आणि शांतता नांदावी यासाठी प्रयत्न. शांतता आणि आर्थिक, सामाजिक आणि राजकीय वातावरण स्थिर राहावे यासाठी सध्या सुरू असलेल्या संघर्षावर चर्चेने तोडगा. 7 मदत शिबिरे संवेदनशील ठिकाणांवरून हटवून सुरक्षित ठिकाणी उभारण्यात येतील. शस्त्रs सीआरपीएफ आणि बीएसएफ तळांजवळ हलवण्यात येतील. सुरक्षा दलांकडून फुटीरतावाद्यांची कसून चौकशी होईल.

संरक्षण, सेमीकंडक्टरसह अनेक करार

सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेंस वोंग तीन दिवसांच्या हिंदुस्थान दौऱयावर असून आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन अनेक द्विपक्षीय मुद्दय़ांवर चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांमध्ये संरक्षण, सेमीकंडक्टर, डिजिटल शिपिंग कॉरीडोर, अंतराळ मोहिमा, नागरी उड्डाण क्षेत्रातील प्रशिक्षण आणि अणुसंशोधन कार्यक्रम, कौशल्य विकास अशा अनेक करारांवर सह्या झाल्या.