भूमिपुत्रांच्या रुद्रावतारामुळे बुलेट ट्रेन अधिकारी पाय लावून पळाले

12
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । ठाणे

एक – दो…एक – दो… बुलेट ट्रेन फेक दो, जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, अशा घोषणा देत शेतकऱ्यांसह आगरी-कोळी समाजबांधकवांनी ‘राष्ट्रीय हाय स्पीड रेल निगम लिमिटेड’तर्फे आयोजित मुंबई – अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रकल्पाची बैठक आज भिवंडीत हाणून पाडली. स्थानिकांच्या रुद्रावताराची माहिती मिळताच सरपंच – उपसरपंचांसोबत असलेल्या या बैठकीआधीच बुलेट ट्रेनकाले पाय लाकून पळाले. त्यामुळे स्थानिकांची जमीन घशात घालण्याच्या मनसुब्याकर किरजण पडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्काकांक्षी प्रकल्प असलेली मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन ठाण्यातील विविध गावांच्या छताडावरून जाणार असल्याने त्याला स्थानिकांचा विरोध आहे. त्यातच आज रविवीर असूनही भिवंडीच्या अंजूर येथील भारोडी गावात सरपंच आणि उपसरपंचांसोबत अधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहणाबाबत बैठक बोलावली होती. मात्र स्थानिकांना याबाबत कुणकुण लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने अधिकाऱ्यांनी अर्ध्या वाटेतून धूम ठोकली.

सरकार कोणत्याही थराला जाईल

बुलेट रेल प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना अंधारात ठेकून ही बैठक आयोजित केली होती. मात्र त्यांचा हा डाक स्थानिकांनी उधळून लाbला असून भूमिपुत्रांची जमीन बळकाकण्यासाठी सरकार कोणत्याही थराला जाईल, मात्र आम्ही एक इंचही देणार नाही असा निर्धार किनोद पाटील या शेतकऱ्याने क्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या