नगर – राज्यपालांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांच्या विरोधात नगर शहर शिवसेनेच्यावतीने नेताजी सुभाष चौक येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून प्रतिमेचे दहन करण्यात आले. तसेच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचाही निषेध करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर जगाचे दैवत आहे, अशा महान व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. नेहमीच राष्ट्र पुरुषाबद्दल बेताल वक्तव्य करण्यात ते धन्यता मानत आहेत. अशा राज्यपालांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. त्यांना या पदावर काढून महाराष्ट्राबाहेर हकलून दिले पाहिजे. तसेच सुधांशू त्रिवेदी यांनीही जे वक्तव्य केले, त्याचा निषेध करून त्यांच्यावर भाजपाने कारवाई करावी, अन्यथा त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल, असा इशाराही संभाजी कदम यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अशोक गायकवाड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, शाम नळकांडे, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, सुरेश तिवारी, संदिप दातरंगे, विष्णू घुले, ज्येम्स आल्हाट, संजय आव्हाड, अभिजित अष्टेकर, पप्पू भाले आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी शिवसैनकांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.