
स्मार्ट पॉवर ग्रीड तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक हरित ऊर्जेसाठी टाटा पॉवर आणि आयआयटी दिल्ली एकत्रित काम करणार आहेत. त्यानुसार इलेक्ट्रिकल व्हेईकलसाठी पायाभूत सुविधा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, हायड्रोजन तंत्रज्ञान, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम, निगराणी व संवेदना सुविधा, मायक्रोग्रीड यांसारख्या क्षेत्रांमध्ये अभ्यास करून संशोधन करण्यासाठी दोघांमध्ये सामंजस्य करार झाला आहे. टाटा पॉवर आणि देशातील अग्रणी संशोधन संस्था आयआयटी दिल्ली यांच्याकडे विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या तज्ञांची मोठी संख्या लक्षात घेत शिक्षणक्षेत्र, संशोधन आणि व्यवसाय क्षेत्रातील तज्ञांमध्ये सहयोग घडवून आणला जाणार आहे.

























































