कृषी अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सवलत, कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी आणि संलग्न अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सवलत देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी दिली. यासंदर्भात राज्यातील कृषी विद्यापीठांच्या शिक्षण संचालक समितीमध्ये तसा ठराव करण्यात आल्याचे भुसे म्हणाले.

विद्यार्थ्यांना शैक्षणीक वर्ष 2020-21 मधील तिसऱया, पाचव्या आणि सातव्या सत्राचे शैक्षणिक शुल्क एक रकमी न भरता तीन हप्त्यात सत्र समाप्ती परीक्षेपूर्वी भरायची सवलत देण्यात आली आहे. विद्यापीठांच्या शिक्षण संचालक समितीची बैठक होऊन त्यात शुल्क भरण्यासाठी सवलत देण्याचा ठराव करण्यात आल्याचे भुसे यांनी सांगितले.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कृषी आणि संलग्न अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनी आगामी शैक्षणिक वर्षात शुल्क भरण्यासाठी सवलत देण्याची मागणी कृषीमंत्र्यांकडे केली होती. यासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत कृषीमंत्र्यांनी चारही कृषी विद्यापीठांचे पुलगुरू आणि अधिष्ठाता यांना निर्देश दिले होते.