
तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दुसरा धक्का बसला आहे. पन्निरसेल्वम यांच्या अण्णा द्रमुकनंतर आता अम्मा मक्कल मुनेत्र कळघम (एएएमके) हा पक्ष एनडीएतून बाहेर पडला आहे.
एएएमकेचे अध्यक्ष टीटीव्ही दिनाकरन यांनी ही घोषणा केली. ‘‘काही लोकांच्या विश्वासघाताविरोधात आम्ही एएएमके ही चळवळ सुरू केली होती. त्यांच्यात काहीतरी बदल होईल अशी अपेक्षा होती. पण विश्वासघातकी कधी बदलणार नाहीत ही खात्री पटल्याने आम्ही निर्णय घेतला आहे. नव्या आघाडीचा निर्णय डिसेंबरमध्ये घेऊ,’’ असे दिनाकरन म्हणाले.