
नगरमध्ये विधानसभेच्या बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच विद्यमान 10 आमदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे तीन माजी आमदार सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. तर दुसरीकडे चार जणांना नव्याने उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे यांना जिल्ह्यामध्ये विद्यमान आमदार यांच्या कस पणाला लागणार आहे.
विद्यमान आमदारांमध्ये काहींची सहावी तर काहींची पाचवी टम असल्याने कोण कोणत्या किती मताधिक्क्याने निवडून येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये दहा विद्यमान आमदार निवडणूक लढवित आहे. यातील भाजपकडून वैभव पिचड, स्नेहलता कोल्हे, राधाकृष्ण विखे, शिवाजीराव कर्डिले, राम शिंदे, मोनिका राजळे यांचा समावेश आहे. तर शिवसेनेकडून विद्यमान आमदार विजय औटी, तसेच श्रीरामपूर मधून काँग्रेस मधून शिवसेनेत आलेले भाऊसाहेब कांबळे यांचा समावेश आहे. तसेच काँग्रेस कडून बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप या दोघांचा समावेश आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने शेवगाव मधून प्रताप ढाकणे, श्रीगोंद्यात घनश्याम शेलार, पारनेर मधून निलेश लंके, कोपरगाव तुन आशुतोष काळे, जामखेड मधून रोहित पवार, अकोलेतुन किरण लहामते, शिवसेनेकडून संगमनेरमध्ये साहेबराव नवले या नव्या चेहर्यांना संधी देण्यात आली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जिल्ह्यामध्ये यावेळेस सुरुंग लागला आहे. काँग्रेसचे राधाकृष्ण विखे भाजपमध्ये तर राष्ट्रवादीचे वैभव पिचड सुद्धा भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे आघाडीची संख्या दोन झाली तर काँग्रेसचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे आघाडीच्या तीन जागांना फटका बसला आहे.


























































