
नगर जिल्ह्यात आज कोरोनाचे 9 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 226 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 122 जणांची स्वॅब टेस्ट करण्यात आली होती. त्यात 2 हजार 849 जणांचे स्वॅब निगेटिव्ह आली आहे. तर 18 जणांचे अहवाल बाकी आहेत. जिल्ह्यात 74 ऍक्टिव्ह केस असून आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे.






















































