नगर जिल्ह्यात अजून 12 पॉझिटीव्ह रुग्ण, तर 10 रुग्णांना डिस्चार्ज

452

नगर जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे 12 रुग्ण आढळले असून दुसरीकडे कोरोनातून मुक्त झालेल्या 10 जणांना घरी सोडण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील नवीन 12 रुग्णांपैकी, संगमनेर तालुक्यातील – 6, नगर शहरात – 2, नगर ग्रामीण – 1, भिंगार – 1, अकोले – 1, पारनेर – 1 असे आहेत. संगमनेर तालुक्यात कुरण येथे 2, पिंपरणे आणि साकुर येथे प्रत्येकी 1 आणि संगमनेर शहरात हुसेननगर आणि लखमिपुरा येथे प्रत्येकी एक बाधित रुग्ण आढळून आला.

नगर शहरात सिद्धार्थ नगर, भिंगार, नवनागापुर आणि केडगाव येथे प्रत्येकी 1 बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी, केडगाव येथील रुग्ण ठाण्याहून आला होता. पारनेर तालुक्यातील गोरेगाव आणि अकोले शहरातील कांदा मार्केट येथे प्रत्येकी एक बाधित रुग्ण आढळून आले.

डिस्चार्ज अहवाल
नगर जिल्ह्यातील 10 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, संगमनेर – 5, नगर मनपा – 2, पारनेर – 1, नगर -1, अकोले तालुका – 1 याप्रमाणे रुग्णांचा यात समावेश आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 283 इतकी झाली आहे. नगर जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या आता 113 झाली असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या