चारा छावण्यांना ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासनाने चारा छावण्यांना दिलेली मुदत 30 सप्टेंबरपयरत होती. मात्र जिल्ह्याच्या काही भागात कमी पाऊस झाल्याने विशषेत: कर्जतग तालुक्यात पावसाच्या कमतरतेमुळे चारा, पाण्याची अद्याप पुरेशी सोय झालेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मागणीनुसार तेथे सुरू असलेल्या चारा छावण्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्याचे आदेश दिले आहेत. तसे पत्र महसूल व वन विभागाचे उपसचिव सु. ह. उमराणीकर यांनी दि.1 रोजी जिल्हाधिकार्‍यांना पाठविल्याने सुरू असलेल्या छावण्या महिनाभर सरूच राहणार आहेत.

चारा, पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी भागात जनावरांसाठी शासनाने चारा छावण्या सुरू करण्यास मंजुरी दिली होती. ऐन मे महिन्यात चारा छावण्यांची संख्या 500च्या पुढे गेली होती. प्रारंभी जूनअखेरपर्यंतच चारा छावण्या सुरू ठेवण्यास मान्यता दिली होती. मात्र जून, जुलैमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने चारा व पाणी पुरेसे उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे पुन्हा शासनाने जुलैअखेरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानतंरही पावसाने साथ न दिल्याने जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता होऊ शकली नसल्याने दुसर्‍यांदा ऑगस्टअखेर चारा छावण्या सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती.

मात्र काही तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने चार्‍याची उपलब्धता नसल्याने तिसर्‍यांदा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत छावण्यांची संख्या 85च्या आसपास होती. या महिन्यात जिल्ह्यातील बहुतेक भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने चारा छावण्या कमी होण्यास मदत झाली. त्यानंतर कर्जत तालुक्यात 36 चारा छावण्या सुरू होत्या. त्यामध्येही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घट होऊन आज अखेर 27 चारा छावण्या सुरू असून, त्यातून लहान- मोठी 15482 जनावरे सरकारी पाहुणचार घेत आहेत. ऑक्टोबर अखेर चारा छावण्यांना मुदतवाढ दिल्याचा आदेश जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला असून, त्यामध्ये पूर्वी असणार्‍या अटी-शर्ती कायम ठेवल्या आहेत.