नगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात रेकॉर्ड 428 रूग्णांची नोंद

703
corona-virus-new-lates

नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४२८ रुग्णांची नोंद झाली. कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८४ जणांचे अहवाल बाधित आढळले. अँटीजेन चाचणीमध्ये ४४ जण बाधित आढळले तर खासगी प्रयोगशाळेत केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या ३०० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता १२८१ इतकी झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२९१ इतकी आहे. जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या आता २६२० इतकी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या