
आज येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये रात्री ३६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये, नगर महापालिका क्षेत्रातील १३, सोनई (नेवासा) येथील १०, संगमनेर तालुक्यातील ०९, श्रीगोंदा तालुक्यातील ०२, शेवगाव तालुक्यातील ०१ आणि भिंगार येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
आज ६६ रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या ७९४ झाली आहे. यातील ४९४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून २८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी नगर महापालिका क्षेत्रात पद्मा नगर येथे एक, सिद्धार्थनगर ०२, चितळे रोड ०६, टिळक रोड ०१, सारस नगर ०१, सावेडी ०१, शिंपी गल्ली ०१ असे रुग्ण आढळून आले. नेवासा तालुक्यातील सोनई येथे १० रुग्ण बाधित आढळून आले. संगमनेर तालुक्यात हिवर गाव पावसा ०१, गुंजाळ मळा ०२, कसारा दुमाला ०१, मिर्झापूर ०१, घुलेवाडी ०३, चास पिंपळदरी ०१ असे रुग्ण आढळून आले.
श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळा ०१, चांबूर्डी ०१ असे रुग्ण आढळून आले. शेवगाव तालुक्यातील निँबे नांदूर येथे एक रुग्ण आढळून आला. भिंगार येथील गवळी वाडा येथेही एक बाधित रुग्ण आढळून आला.
याशिवाय, खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले ०९ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये नगर मनपा क्षेत्रातील ०३, राहाता ०३, श्रीरामपूर ०२ आणि पाथर्डी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान आज सकाळी एकूण २१ बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये नगर मनपा ०८ (अरणगाव रोड, केडगाव (०५), सर्जेपुरा, तारकपुर आणि गवळीवाडा प्रत्येकी ०१.) श्रीरामपूर तालुका ०२, नेवासा तालुका ०२, अकोले तालुका ०१, संगमनेर ०१, श्रीगोंदा तालुका ०१, राहुरी तालुका ०१, जामखेड तालुका ०२, भिंगार ०१, पारनेर ०१ आणि कर्जत तालुक्यातील एक रुग्ण आढळून आला होता.