
पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा गावात रविवारी बिबटय़ा एका घरात घुसल्यामुळे प्रचंड तारांबळ उडाली. बिबटय़ा कुत्र्याच्या पिल्लाच्या मागे लागला होता. घरातील लोकांनी प्रसंगावधान राखून लहान मुलांना बाहेर काढले आणि बिबटय़ाला कोंडून ठेवले. नंतर वन खात्याने दोन तासांनी बिबटय़ाला पिंजऱयात बंदिस्त केले.
दिलीप जगताप यांच्या घरात ही घटना घडली. बिबटय़ाला पाहून घरातील सर्वांचाच थरकाप उडाला होता. मात्र या संकटाच्या परिस्थितीतही जगताप कुटुंबीयांनी प्रसंगाकधान राखले आणि लहान मुलांना दुसऱया दरकाजातून घराबाहेर काढले. त्यानंतर दोन्ही दरकाजे बंद करून बिबटय़ाला कोंडले. या वेळी कुत्र्याचे पिल्लू भिंतीला असलेल्या छोटय़ा खिडकीतून बाहेर पडले. घटनेबाबत सरपंच अशोक घुले यांनी वनखात्याला कळवले. त्यावर कनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांनी जुन्नर येथील माणिकडोह बिबटय़ा बचाक केंद्राला माहिती दिली. बचाक केंद्राचे पथक आणि पारनेर कनकिभाग यांनी घटनास्थळी येऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.
या ऑपरेशनमध्ये बिबटय़ाला भुलीचे इंजेक्शन देऊन त्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. बिबटय़ा घरात घुसल्यामुळे रोठा गावासह संपूर्ण पारनेर तालुक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. परिसरात आणखी बिबटय़ांचा वावर असू शकतो. या पार्श्वभूमीवर वन विभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

























































