नगर पुणे महामार्गावर अपघात, लक्झरीने दिलेल्या धडकेत 3 ठार 11 जखमी

नगर पुणे महामार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमाराला लक्झरी आणि पिकअप गाडी यांमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये 3 जण जागीच ठार झाले असून 11 जण जखमी झाले आहेत. हा अपघात नगर पुणे महामार्गावर घडला असून यामध्ये एक बालिकेची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. दरम्यान या प्रकरणासंदर्भामध्ये नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली आहे. पिकअप मधील सर्वजण हे पुणे या ठिकाणाहून लग्नाचा बस्ता बांधून पुन्हा आपल्या गावी धाराशिव जिल्ह्यामध्ये जात होते त्यावेळेला हा अपघात झाला.

प्रवीण गोरख कागदे, (वय 26 वर्ष, रा मोरगाव, ता.जि-बीड), सारिका मच्छिंद्र कागदे आणि दीपक चव्हाण, (रा- पखरूड, ता-भूम,धाराशिव) हे मयत झाले आहेत. तर सुरज बजरंग कागदे (वय-18 वर्ष, रा-मोरगाव, ता.जि-बीड) , बजरंग शेषराव कागदे (वय-रा-मोरगाव, ता.जि-बीड -जखमी), धीरज मच्छिंद्र कागदे (वय-17 वर्ष,-मोरगाव, ता.जि-बीड), मच्छिंद्र शेषेराव कागदे (मोरगाव, ता.जि-बीड), राहुल गोरख कागदे (वय-23 वर्ष, रा. मोरगाव, ता.जि-बीड), सीता बजरंग कागदे, आरुषी मच्छिंद्र कागदे (वय-9 वर्ष), आरती प्रवीण कागदे (21 वर्ष), आरती बजरंग कागदे (15 वर्ष), श्रुती मॅचिंद्र कागदे (वय-14), धीरज राजाभाऊ जोगदंड (रा-पिंपळगाव, ता-वाशी,धाराशिव) हे जखमी झाले आहे.