कोरोना नियमांचे उल्लंघन करून भरविली यात्रा; ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्यांसह पोलीस पाटील व विश्वस्तांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाकाळात यात्रा-जत्रांवर बंदी असतानाही नेवासा तालुक्यातील वरखेड येथील श्री महालक्ष्मीची यात्रा भरविणे गावकारभाऱयांना चांगलेच महागात पडले आहे. कोरोनाबाबतचे जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत यात्रेची गर्दी झाल्याबद्दल वरखेडच्या महालक्ष्मी देवी मंदिर समितीचे उपाध्यक्ष व विश्वस्त सदस्य, गावचे सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील यांच्यासह देवस्थान विश्वत मंडळासह एकूण 24 जणांवर गुन्हा झाला आहे.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची सर्वत्र भीती असतानाही वरखेडसारख्या ग्रामीण भागातील यात्रेस 20 हजार भाविक उपस्थित होते. तसेच या ठिकाणी देवीला नैवेद्य म्हणून 700 ते 800 बोकडबळी दिले गेले. या दोन्ही घटनांमुळे जिल्हा प्रशासन अत्यंत सतर्क झाले आहे. स्थानिक मंदिर विश्वस्त व ग्रामपंचायत पदाधिकारी, तसेच पोलीस पाटील यांनी याबाबत हलगर्जीपणा दाखविलेला आहे.

संतप्त झालेल्या पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांनी स्वतः वरखेड येथे जाऊन भाविकांना व दुकानांना हटविले होते. श्री महालक्ष्मी देवी ट्रस्ट मंडळाचे उपाध्यक्ष व विश्वस्त सदस्य, गावचे सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देवीची यात्रा भरू न देणे, तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळणे अपेक्षित असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून यात्रा भरवून गर्दी केली म्हणून श्री महालक्ष्मी देवी ट्रस्ट मंडळाचे उपाध्यक्ष व विश्वस्त सदस्य, सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील संतोष घुंगासे यांच्याविरुद्ध यात्रा भरविल्याबद्दल नेवासा पोलीस ठाण्यात हवालदार राहुल बबन यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 24 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावेल

क्षाधीश लक्ष्मण दाणे, कडू-पाटील, गोविंद गोरे, देवराव भाऊराव शिरसाठ, रामभाऊ आसराजी हारदे, रंगनाथ मारुती पवार, रामचंद्र धन्नू कुंढारे, रामदास नानासाहेब गोरे, नवनाथ नाथा वाघ, उत्तम कचरू शिरसाठ, भगवान काशिनाथ जगधने, रावसाहेब एकनाथ कुंढारे, सुरेश शंकर शिरसाठ, बाळासाहेब आश्रू शिरसाठ, विनोद जनार्दन ढोकणे, शशिकला शांतवन खरे, अशोक जयवंत दाणे, दत्तात्रय पिराजी हारदे, प्रियंका विलास उंदरे, शोभा श्रीरंग हारदे, सोनाली मोहिनेश्वर गणगे, राणी संजय आंबेकर, छाया भास्कर खरे, सुमन नंदू बिरुटे व संतोष भगीरथ घुंगासे.