नगरचा पाणीपुरवठा सोमवारपासून तीन दिवस होणार विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील दुरुस्तीसाठी सोमवारी (दि. 20) शटडाऊन घेतला जाणार आहे. त्यामुळे सोमवार, मंगळवार व बुधवार असे तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

सोमवारी (दि. 20) सकाळी 11 ते सायंकाळी 6 यादरम्यान शटडाऊन असून, या कालावधीत मुळानगर विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने पाणी वितरणाच्या टाक्या भरता येणार नाहीत. त्यामुळे सोमवारी सकाळी 11 नंतर बोल्हेगाव, नागापूर, गुलमोहोर रोड, शिवाजीनगर या भागास पाणीपुरवठा होणार नाही.

या भागाला मंगळवारी पाणीपुरवठा करण्यात येईल. मंगळवारी (दि. 21) रोटेशननुसार पाणी वाटपाच्या मंगलगेट, रामचंद्र खुंट, कोठला, बुरुडगाव रोड या भागास मंगळवारऐवजी बुधवारी पाणीपुरवठा होणार आहे. सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, विनायकनगर, आगरकर मळा, सावेडी या भागास बुधवारऐवजी गुरुवारी (दि. 23) पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, असे मनपा प्रशासनाने म्हटले आहे.