
केवळ एआयचा वापर करुन कंटेटच्या मदतीने एका इंडियन युट्युब चॅनलने वर्षभरात 38 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. एआय वापरुन कंटेट टाकणाऱ्या या इंडियन युट्युब चॅनलवर ‘बंदर अपना दोस्त’ जगभरात जास्त पाहिला जातो. व्हिडीओ एडिटींग प्लॅटफॉर्म कॅपविंगने आपल्या अभ्यासात एआयने बनवलेला व्हिडीओचा स्केल आणि छाप पाहण्यालाठी 15 हजारहून अधिक चॅनलचा अभ्यास केला. ज्यानंतर ‘बंदर अपना दोस्त’ हा चॅनलला लोकांची पसंती असून तो सर्वात जास्त पाहिला जातो.
कॅपविंगच्या अभ्यासात, या चॅनलला 2.07 बिलीयन व्ह्यूज मिळाले आहेत तर 2.75 मिलियनहून अधिक सबस्क्रायबर आहेत. हा चॅनल वर्षभरात 38 लाख रुपयांची कमाई करतो. हा चॅनल माकडाच्या कॅरेक्टरचे शॉर्ट व्हिडीओ क्लिप अपलोड करतात. एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन बनवलेले व्हिडीओ जगभर चालतात.नवीन वापरकर्त्याला दाखवल्या जाणाऱ्या पहिल्या 500 शॉर्ट्सपैकी 33 टक्के AI-निर्मित व्हिडिओ आहेत.
























































