
नाशिक येथील टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतराचा प्रयत्न तसेच लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपाखाली एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याला आज गुरुवारी सायंकाळी ७ वाजता नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले. नाशिक पोलिसांचे विशेष पथक छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले होते.
जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणांमध्ये निदा खानविरुध्द नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण राज्यभर गाजत असल्याने निदा खानचा पोलीस शोध घेत असता निदा खानला मतीन पटेल याने आश्रय दिल्याचे समोर आले. पटेल न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने त्याच्याविरोधात वॉरंट बजावले होते. दरम्यान, मतीन पटेल याचे वकील अॅड. अभयसिंग भोसले यांनी सांगितले की, न्यायालयाने उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले होते. त्यानुसार मतीन पटेल हे शुक्रवारी स्वतःहून न्यायालयात हजर राहणार असून, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात येईल.




























































