वंचित आणि एमआयएमचं फाटलं, ओवैसीकडून दुजोरा

1275

राज्यातील वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची तुटी तुटली आहे. अशी घोषणा एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी केली होती. तरी ओवैसी काय म्हणतात याकडे प्रकाश आंबेडकरांचे लक्ष होते. आता ओवैसी यांनीही ही युती तुटली आहे असे जाहीर केले आहे.

ओवैसी म्हणाले की इम्तियाझ जलील यांनी जी भुमिका मांडली आहे ती पक्षाची अधिकृत भुमिका आहे. याचाच अर्थ राज्यातील वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती तुटल्यात जमा आहे.

लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे निवडणुका लढवल्या होत्या. यात फक्त एमआयएमचा एक खासदार निवडून आला होता. वंचितचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. आता आगामी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढवतील असा अंदाज होता. परंतु एमआयएम वंचितची साथ सोडली आहे. त्यामुळे पुढील काळात राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणे पहायला मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या