
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘हवामान खराब आहे, इंधन संपत आलंय, आम्ही पुरते अडकलोय…’ हा गंभीर संदेश होता एअर इंडियाच्या पायलटचा. 11 सप्टेंबर रोजी एअर इंडियाच्या बोइंग 777-300 विमानाने उड्डाण केले खरे, पण अमेरिकेतील वादळाच्या तडाख्यात विमान सापडले. विमानातील 370 प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. तब्बल दीड तास विमानाने हवेत घिरट्या घातल्यानंतर वरिष्ठ पायलट रुस्तम पालिया यांनी विमान सुखरूप उतरवले.
गेल्या आठवड्यात अमेरिकेत फ्लॉरेन्स वादळाने थैमान घातले होते. त्या वेळी तिथल्या अवकाशात विमानाचा थरार सुरू होता. दिल्लीवरून निघालेले एअर इंडियाचे विमान न्यूयॉर्कजवळ पोहोचले होते. वातावरण खूपच खराब झाले होते. अशातच विमानानेत इंधन कमी उरले होते. इन्स्ट्रमन्ट लँडिंग सिस्टम (ILS) हे कमी दृष्यमानतेमध्ये काम करणारे यंत्र बंद पडले. यामुळे विमानाला जास्त दृष्यमानता असलेल्या धावपट्टीकर उतरवण्याती गरज होती, मात्र हवामान खराब असल्याने पायलट विमान उतरवू शकत नक्हते. यामुळे कॅप्टन पालिया आणि सिंह यांना विमान उतरविण्याचा निर्णय रद्द करावा लागला. विमान कमी इंधनावरच हवेत घिरट्या घालू लागले.
जेकेएफ विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाअगोदर दुसरे विमान उतरणार होते. कॉकपीटने इशारा दिला. यामुळे विमानानेने पहिली घिरटी घातली. दुसरा प्रयत्न करून विमानतळाकर उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक बिघाडामुळे अन्य उपकरणेही बंद होऊ लागली.
कॅप्टन पालिया आणि सिंह यांनी नियंत्रण कक्षाला न घाबरता विमान बिघडल्याचे सांगितले. यामुळे पुढे ही उपकरणे नीट होतील का याबाबत शंकाही व्यक्त केली. नियंत्रकाने त्यांना मार्गदर्शन केले. त्याने ऍटोलँडचा पर्याय निवडण्यास सांगितले, मात्र विमानानेचे दोन्ही रेडियो अल्टीमीटर बंद पडले होते. तसेच ट्रॅफिक कोलिजन अवॉइडेंस सिस्टमही बंद पडल्याने दिसत नसताना विमान उतरवणे धोक्याचे असल्याचे सांगितले. तसेच दुसर्या सुरक्षित धावपट्टीचा पर्याय देण्यास सांगितले. नेवार्क, बोस्टन, लोगान, वाऑशिंग्टन, डलाससारख्या जवळच्या विमानतळांचाही पर्याय सुचविण्यात आला, मात्र तेवढे इंधन विमानानेत नव्हते. त्याचदरम्यान नेवार्कच्या विमानतळाकरील वाताकरण निवळायला लागले. यामुळे एटीसीने नेवार्कला विमान नेण्यास सांगितले. तसे विमान नेवार्ककडे कळले.
आणि सुटकेचा निःश्वास सोडला
विमानाने 14 तासांचे अंतर पार केले होते. त्यामुळे विमानात फक्त 7,200 किलो इंधन उरले होते. या दीड तासांच्या हवेतील थरारक कसरतींनंतर विमान शेवटी पायलटांनी मोठ्या कौशल्याने नेवार्कला सुखरूप उतरविले. त्यांनी आपला अनुभव आणि कौशल्य पणाला लावले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
























































