Air India Plane Crash – अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांची संपूर्ण यादी समोर, विजय रुपाणींसह 169 हिंदुस्थानींची नावं

एअर इंडियाचे AI171 हे प्रवासी विमान अहमदाबादमध्ये कोसळले. हे विमान लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे मार्गस्थ झाले होते. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळवरून उड्डान घेतलेले हे विमान उड्डाणानंतर काही क्षणात मेघानीनगर भागातील डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले. या विमानामध्ये 230 प्रवाशांसह 12 क्रू मेंबर होते. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश असल्याचे विमानाच्या प्रवाशांच्या यादीवरून स्पष्ट होत आहे. अर्थात याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

‘एअर इंडिया’ने AI171 हे प्रवासी विमान कोसळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणार होते. दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी हे विमान कोसळले. या विमानामध्ये क्रू मेंबरसर 242 प्रवासी होते. यापैकी 169 जण हिंदुस्थानी होते, तर 53 जण ब्रिटिश नागरीक होते. 7 जण पोर्तुगालचे आणि 1 जण कॅनडाचा नागरीक होते.

अपघातानंतर एअर इंडियाने 1800 5691 444 हा आपत्कालिन नंबर जारी केला आहे. तसेच या संपूर्ण अपघाताची उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहे. तर विमान वाहतूक मंत्रालयानेही 011-24610843 | 9650391859 हे नंबर जारी केले आहेत.