
एअर इंडियातील कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन एअर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव बन्सल यांची आज शिवसेनाप्रणीत एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीच्या शिष्टमंडळाला दिले. याशिवाय कामगारांच्या अन्य प्रलंबित मागण्यांवरही तोडगा काढला जाईल असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीच्या शिष्टमंडळाने राजीव बन्सल यांची आज नवी दिल्ली येथील एअर इंडियाच्या राजीव गांधी भवन मुख्यालयात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तत्पूर्वी, खासदार कीर्तिकर यांनी पेंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनाही कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत कल्पना दिली होती. बन्सल यांच्याबरोबर शिष्टमंडळाने एअर इंडियाच्या उपकंपनीतील कामगारांच्या महत्त्वपूर्ण मागण्यांवर सखोल चर्चा केली. त्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देतानाच बन्सल यांनी भविष्यातही कामगार-कर्मचाऱयांच्या हिताचेच निर्णय घेतले जातील असे सांगितल्याची माहिती खासदार कीर्तिकर यांनी दिली.
शिष्टमंडळात एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष, आमदार विलास पोतनीस, सरचिटणीस प्रशांत सावंत, सह-सरचिटणीस बाळा कांबळे, प्रवीण शिंदे, चिटणीस अजित चव्हाण, कार्याध्यक्ष सुनील निंगावले आदींचा समावेश होता. याप्रसंगी एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसचे मुख्याधिकारी रामबाबू, इंजिनीयरिंग सर्व्हिसेसचे मुख्याधिकारी जोस मॅथ्यू, कार्मिक एअर इंडियाच्या संचालिका अमृता शरण उपस्थित होत्या.
शिष्टमंडळाने मांडलेल्या मागण्या…
- एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमधील पंत्राटी कर्मचाऱयांना कायम करा. पुणे, मुंबई येथील सेवेतून सध्या बाहेर असणाऱया पंत्राटी कर्मचाऱयांनाही तत्काळ सेवेमध्ये सामावून घ्यावे.
- कर्मचारी वसाहतीत राहणाऱया कर्मचाऱयांना सेवानिवृत्तीपर्यंत राहण्याची अनुमती द्यावी.
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधील रक्कम कर्मचाऱयांच्या सेवानिवृत्तीपर्यंत अबाधित ठेवावी.
- कर्मचाऱयांची प्रलंबित थकबाकी तत्काळ द्यावी.
- एअर इंडियाचे खासगीकरण झाल्यानंतर एअर इंडिया व तिच्या उपकंपनीतील सर्व कर्मचाऱयांना सेवानिवृत्तीपर्यंत नोकरीची हमी देऊन सेवेत असलेल्या व निवृत्त कर्मचाऱयांना वैद्यकीय सुविधा, विमान प्रवास व अन्य सुविधा कायम ठेवाव्यात.
- पदोन्नतीचे प्रश्न तत्काळ सोडवण्यात यावेत.



























































