
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान ‘चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ’ म्हणून काम पाहिलेले एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी बुधवारी हवाई दलाचे नवीन उपप्रमुख (व्हाइस चीफ ऑफ द एअर स्टाफ) म्हणून पदभार स्वीकारला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हवाई दलात चार दशकांच्या सेवेनंतर ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या एअर मार्शल नागेश कपूर यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हवाई दलाचे नवीन उपप्रमुख (VCAS) म्हणून पदभार स्वीकारताना एअर मार्शल दीक्षित यांना हवाई दलाचे मुख्यालय असलेल्या वायू भवन येथे ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला.
या समारंभापूर्वी, त्यांनी नॅशनल वॉर मेमोरिअलला भेट दिली आणि सशस्त्र दलातील शहीद वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुष्पचक्र अर्पण केले.
हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी, ते येथे ‘हेडक्वार्टर्स इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ’ (HQ IDS) मध्ये ‘चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ’ (CISC) म्हणून कार्यरत होते.
एअर मार्शल दीक्षित यांनी १ मे २०२५ रोजी ‘सीआयएससी’ (CISC) पदाची सूत्रे हाती घेतली होती, जी त्यांनी ३० जून रोजी सोडली.






























































