
दुबईहून हैदराबाद येथे आलेल्या एका प्रवाशाने चक्क त्याच्या गुदद्वारातून 14 लाख रुपयांचं सोनं लपवून आणल्या प्रकरणी कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. मोहम्मद अकबर मोईनुद्दीन असे त्या तस्कराचे नाव असून त्याने सोन्याच्या दोन कॅप्सुल गुदद्वारात लपवल्या होत्या.
दुबईवरून एक तस्कर सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्याआधारे अधिकाऱ्यांनी हैदराबाद विमानतळावर प्रवाशांची तपासणी केली. त्यात संशयित म्हणून अकबरमोईनुद्दीन याची चौकशी केली असता त्याने त्याचा गुन्हा कबूल केला असून सोने गुदद्वारात लपवल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून तब्बल 300 ग्राम सोन्याच्या कॅप्सुल जप्त केल्या आहेत.
गेल्या महिन्यात कोईम्बतुर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन महिलांना अंतवस्त्रातून सोन्याची तस्करी केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. मेटल डिटेक्टरमधून जात असताना मशिनने सिग्नल दिला. त्यानंतर त्या दोघींची तपासणी केली असता त्या दोघींनी सॅनिटरी पॅड्समध्ये सोने लपवले होते.





























































