
अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड आणि अपघातांची मालिका सुरूच आहे. असे असताना विमान कंपन्या प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा जाहिरातींवर अधिक खर्च करत असल्याची धक्कादायक बाब तब्बल 44 हजार प्रवाशांच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
लोकलसर्पल्सने प्रवाशांना प्रश्न विचारले व त्यांच्याकडून अनेक गोष्टी जाणून घेतल्या. 76 टक्के प्रवाशांनी विमान कंपन्यांना प्रवाशांच्या सुरक्षेशी काहीच देणेघेणे नसल्याचे सांगितले. यात 63 टक्के पुरुष आणि 37 टक्के महिलांचा समावेश होता. विमानांमध्ये होत असलेल्या तांत्रिक बिघाडाच्या वाढत्या घटना आणि दुर्घटनांमुळे विमान प्रवाशांचा विमान कंपन्यांवरील विश्वास घटत चालल्याचे चित्र आहे. डीजीसीएने अलीकडेच केलेल्या तपासणीत विमान पंपन्या आणि विमानतळ प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे अनेक दुर्घटना घडल्याचे समोर आले. देखभाल आणि दुरुस्तीत हलगर्जीपणा, पुठल्याही प्रकारचे रेका@र्ड नसणे, कर्मचाऱयांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव, धावपट्टीची देखभाल दुरुस्ती वेळच्या वेळी न करणे अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
प्रवाशांनी काय उत्तरे दिली?
43 टक्केः सर्व विमान कंपन्यांमध्ये सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे.
33 टक्केः काही विमान कंपन्या निष्काळजीपणा करतात.
13 टक्केः स्पष्ट उत्तर दिले नाही.
11 टक्केः विमान कंपन्यांचे सुरक्षेकडे दुर्लक्ष होत नाही.