एअरटेल, वोडाफोन, आयडियाच्या ग्राहकांना दणका; इनकमिंग दरात होणार वाढ

4934

टेलिकॉम कंपनी सध्या तोट्यात जात असून त्यांनी त्यांच्या दरात वाढ केली आहे. या कंपन्यांनी त्यांच्या वैधता रिचार्ज योजनांमध्ये बदल केला आहे. तोट्यात गेलेल्या या टेलिकॉम कंपन्यांनी प्री-पेड ग्राहकांना पुन्हा दरवाढीचा धक्का दिला आहे. 2019 डिसेंबरमध्ये एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि जियोने आपल्या सर्व प्री-पेड योजनांमध्ये बदल केला आहे.

जवळपास सर्वच कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज योजनांमध्ये बदल केला आहे. दरम्यान, एअरटेल वोडाफोन आणि आयडियानेही रिचार्ज प्लॅनच्या किमतींमध्ये बदल केला आहे. आता ग्राहकांना त्यांचे टेरीफ प्लॅन सुरू ठेवण्यासाठी रिचार्ज करताना कमीतकमी 21 रुपये जास्तीचे खर्च करावे लागतील. मिनिमम रिचार्ज प्लान ही एक प्रकारे वैधता रिचार्ज योजना आहे.

एअरटेल, वोडाफोन आणि आयडियाची कमीतकमी वैधता रिचार्ज योजना 24 रुपये होती. वोडाफोन आणि आयडियाची ही योजना आता 49 रुपयांची झाली आहे. एअरटेलच्या इनकमिंग रिचार्ज योजनांच्या किमती आता 45 रुपये, 49 रुपये आणि 79 रुपयांवर गेल्या आहेत. तसेच वोडाफोन आणि आयडियाच्या 28 दिवसांच्या इनकमिंग योजनेची किंमत 49 रुपये आणि 79 रुपये आहे.

आपली प्रतिक्रिया द्या