
लोअर परळ येथील रेल्वे पुलाखालील मोकळया जागेमध्ये ज्येष्ठ नागरीकांकरीता विरंगुळा केंद्र, लहान मुलांकरीता गार्डन तसेच तरूणांकरीता ओपन जिम इ. सुविधा निर्माण करून त्याचा सद्या होणारा दुरूपयोग टाळावा. तसेच मंगलप्रभात लोढा हे मुंबई महानरगपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून ही मोकळी जागा शिवकल्याण केंद्र या केंद्रास द्यावा म्हणून पत्रव्यवहार व बैठक घेत आहेत. याचा तीव्र निषेध करीत आमदार अजय चौधरी यांनी आणि विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांनी करिरोड नाका येथे स्थानिक रहिवाशांच्या वतीने लाक्षणिय उपोषण केले.
सर्व फोटो – रुपेश जाधव































































