मोठी बातमी – अजय देवगणची गाडी रोखणाऱ्याला मुंबईत अटक, शेतकरी आंदोलनाबाबत…

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) याची गाडी भररस्त्यात रोखणाऱ्या एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी सकाळी गोरोगाव भागात ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले होते. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा या देशांतील राजकीय नेत्यांनंतर सेलिब्रेटींनीही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. हॉलिवूड पॉप स्टार रिहाना हिनेही ट्वीट करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. यानंतर रिहानावर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी निशाणा साधला होता. यात अजय देवगण याचाही समावेश होता.

हिंदुस्थान किंवा हिंदुस्थानातील धोरणांविरूद्ध कोणत्याही चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका. ही वेळ आपण एकत्र उभं राहण्याची आहे, असे ट्वीट करत अजयने रिहानाला सुनावले होते. याच संदर्भातून अजय देवगण याची कार गोरेगाव भागात एकाने रोखली होती.

आपली प्रतिक्रिया द्या