कृषी विधेयकाविरोधात 25 सप्टेंबरला देशभर आंदोलन – डॉ. अजित नवले

केंद्र सरकारने कृषी विषयक विधेयके बहुमताच्या जोरावर मंजूर केली आहेत. आज केंद्र सरकारचा विजय झालेला असला तरी शेतकऱयांचा पराजय झाला आहे. त्यामुळे या विधेयकाच्या विरोधात येत्या 25 तारखेला देशभर आंदोलन सुरू होईल. त्यानंतर सरकारला माघार घ्यावीच लागेल, असे किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी स्पष्ट केले आहे.

डॉ. नवले म्हणाले, ‘बहुमताच्या जोरावर शेतकऱयांना हमीभाव नाकारणारे, बाजार समित्या उद्ध्वस्त करणारे, सरकारची जबाबदारी कमी करणारे, शेती आणि शेतकऱयांना कॉर्पोरेट घराणे, कंपन्या, दलाल यांच्या दावणीला बांधणारी कृषी विधेयके केंद्र सरकारने मंजूर करून घेतली आहेत. त्याचे कायद्यामध्येही रूपांतरण केले जाईल.

या सगळ्या कायद्यांना देशभरातील शेतकऱयांचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे किसान संघर्ष समन्वय समिती अंतर्गत 208 संघटना याविरोधात संबंध देशभर लढत आहेत. 25 सप्टेंबरला या विधेयकांच्या विरोधात देशभर आंदोलन करण्याची हाक संघर्ष समितीने दिली आहे. दिल्याचे डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या