
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष आणि त्यांनी स्थापन केलेले महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार यात माझ्या मनात मुळीच शंका नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणार नाही या विरोधकांच्या आरोपालाही अजित पवारांनी उत्तर दिले. विरोधकांनी काय सांगावे हा त्यांचा अधिकार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष मिळून या सरकारमध्ये राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. महाविकास आघाडीचे हे सरकार पाच वर्षे टिकणार यात शंका नाही, असे अजित त्यांनी सांगितले.
मी नाराज नाही…
मी कालही नाराज नव्हतो, आजही नाही आणि उद्याही नसणार. मी बंड केलेले नाही तर भूमिका मांडली. मला जे काही बोलायचे ते योग्य वेळ आल्यावर बोलेन, असे स्पष्ट करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ते नाराज असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.































































