
महानगरपालिका निवडणुकीचे मतदान काही दिवसांवर आले असताना अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये उभे केलेले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार हे सचिन खरात यांच्या गटाचे असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता स्वतः खरात यांनी तडकाफडकी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे अजित पवारांची मोठी अडचण झाली आहे.
पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार दिल्यावरून अजित पवार यांच्यावर बरीच टीका झाली होती. पुण्यातील आंदेकर टोळी आणि इतर कुख्यात टोळ्यांच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘एबी फॉर्म’ भरले होते, मात्र ते उमेदवार मित्रपक्ष असलेल्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटा’चे असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले होते, मात्र आता सचिन खरात यांनीच या निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.































































